एटीएसची कारवाई : ‘आयएसआय’ला गोपनीय माहिती देणारा अटकेतसंबंधित व्यक्ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चा कर्मचारी

 
: पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ला भारतीय बनावटीच्या विमानांची माहिती पुरवणाऱ्याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी ‘एचएएल’चा कर्मचारी असल्याचे प्रार्थमिक माहितीत निष्पन्न झाले आहे. दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस), नाशिक युनिटला या संदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
या बद्दल मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती पुरवत होता. ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्ती पुरवत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दीपक शिरसाठ (४१) असे या आरोपीचे नाव असून त्यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
 
अटक आरोपी एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने तयार करणाऱ्या कंपनीची संवेदनशील माहिती देत असल्याचा आरोप आहे. तो हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत कर्मचारी असून कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होता.

 भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता. त्याच्याकडून तीन मोबाईल, पाच सिमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. हे सर्व साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीमध्ये पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here