सिल्लोड (जि.औरंगाबाद) : काळाचा आघात किती वेदनादायी असतो, याचा थरार गुरुवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातातून पुढे आला. वऱ्हाडाला घेऊन निघालेल्या पिकअप वाहनाचा सिल्लोड-कन्नड मार्गावरील मोढा फाट्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून झालेल्या भीषण अपघातात मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला तर तब्बल १४ जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यावर गुरूवारी दुपारी मंगरूळमध्ये सहाजणांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला टाहो, हुंदके अन् हाहाकाराने सर्वत्र शाेककळा पसरली होती. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघातात मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील चार महिलांचा अंत झाल्याने त्या घरात आता चूल पेटविण्यासाठी महिलाच उरली नाही. तर सख्ख्या भावांचाही अंत झाला आहे. चारही कुटुंबातील मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना व मृतांना मदत करत कुटुंबांचे सांत्वन केले.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
आवश्यक सुरक्षा उपाययोजना करेल: एअर इंडिया फ्लाइट धोका केंद्र
नवी दिल्ली: भारताने गुरुवारी सांगितले की ते हिंसाचार आणि धमकावणाऱ्या कट्टरपंथी आणि दहशतवादी घटकांच्या कारवायांवर परदेशी सरकारांशी...
1212 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41बाधितांचा मृत्यू
सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1212 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले...
भारतात 1,249 कोविड प्रकरणे, सक्रिय संक्रमण 7,927 नोंदवले गेले
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 1,249 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहेत कारण सक्रिय प्रकरणे 7,927 वर...