एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावं लागेल, मोदी-शहांकडून थेट संदेश

    137

    खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांना जावं लागेल. मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावं लागेल. असा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दिला आहे. तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे दरवाजे बंद झाले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. तसंच मी पुन्हा येईन, हा देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हीडिओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. त्यावरही राऊतांनी भाष्य केलं आहे.

    एकनाथ शिंदे यांना जावं लागेल. मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावं लागेल. असा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दिला आहे. तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे दरवाजे बंद झाले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं स्थान हे धुळीस मिळालं आहे. याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here