गेल्या अनेक दिवसांपासून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा आजाराने त्रस्त आहे. अशातच आता कांबळीची प्रकृती बिघडल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला आहे.? मात्र आता क्रिकेटपटू विनोद कांबळीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ?
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पुढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
?⚕तसेच श्रीकांत शिंदे हे लवकरच विनोद कांबळीची भेट देखील घेणार आहेत. याशिवाय डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी दिसल्या आहेत. त्यामुळे तो त्रस्त आहे. मात्र आता कांबळीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.