- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर काल (27 डिसें.) रात्री प्राणघातक हल्ला झाला. यावेळी काही अज्ञातांकडून रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अचानक मोठ्या दगडाने त्यांच्या गाडीच्या काचेवर आघात करण्यात आला. या हल्ल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
- *वाचा सविस्तर घटना…*
- ▪️ रोहिणी खडसे या काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच 19 सीसी-1919 या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. माहीतीनुसार, घटनेदरम्यान रोहिणी खडसे बचावासाठी शेतात पळाल्याने त्या सुखरूप आहेत.
- ▪️ माहीतीनुसार, रोहिणी खडसे मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. काल (27 डिसेंबर) रात्री झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड झाली असल्याचं समजतंय. सुदैवाने रोहिणी खडसे यांना काहीही दुखापत झाली नाही.
- ▪️ रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचे ड्रायव्हर असे एकूण तीन जण कारमध्ये होते. दरम्यान त्या पाच हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन केले आहे. मात्र हा हल्ला राजकीय वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्या हल्लेखोरांकडे लोखंडी रॉडसह शस्त्रंही होती असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.
- रोहिणी खडसे यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी करत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.