अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :- इयत्ता 10 वी व 12 वी बोडांच्या परिक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या रायगड जिल्ह्यामधून प्रत्येकी एका माजी सैनिक विधवेच्या पाल्याला (10 वी मधून एक व 12 वी मधून एक) रक्कम रू. 5 हजार (अक्षरी रूपये पाच हजार मात्र) देऊन एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक विधवांनी या पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दि.10 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या (10वी मधून एक व 12 वी मधून एक) पाल्यांचे नाव जिल्ह्यामार्फत निवड समितीला पाठविण्यात येईल.
यासाठी वैयक्तिक अर्ज, फॉर्म डी.डी.40 (कार्यालयात उपलब्ध), माजी सैनिक/विधवा पत्नीचे ओळखपत्र, 10 वी 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र, सेवापुस्तकामध्ये पाल्याचे नाव असलेल्या पानांची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँकेच्या पानाची सुस्पष्ट छायांकित खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी कोडसह प्रत ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (नि.) मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
0000000







