पुणे – ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्व संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीनंतर दांडेगावकर म्हणाले, ‘‘ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो. यंदाचा करार २०२०-२१ ते २०२२-२३ पर्यंत केला आहे. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना ३५ ते ४५ रुपये वाढवून मिळणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांना या दरवाढीसाठी ३०० ते ३५० कोटी रुपये गतवर्षीच्या तुलनेत अधिक द्यावे लागणार आहेत. सर्व संघटनांनी या निर्णयाला आजच्या बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्राला मान्य होणारा हा तोडगा काढला आहे. राज्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे.’’
पुणे महापालिकेतील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सुरेश जगतापांकडे
दरम्यान, स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची नोव्हेंबरअखेर नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी सूचना शरद पवार यांनी बैठकीत केली.






