उस्मानाबादच्या कृष्णा तवलेंची तीनशे तरूणांमधून युवक काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड

524

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा तवले यांची निवड झाली आहे. देशभरातून निवडलेल्या ३०० युवकांपैकी कृष्णा यांनी तिसरा क्रमांक मिळवत पहिल्यांदाच महाराष्ट्राला हा बहुमान मिळवून दिला. त्यांच्या या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षाकडून कृष्णा यांचे कौतुक होत आहे.*युवक हा राजकारणातील दिशादर्षक असतो, असे म्हटले जाते, वक्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच हेतूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या “यंग इंडिया के बोल” ही राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक राज्यातून पाच याप्रमाणे देशभरातून ३०० स्पर्धक निवडण्यात आले होते.*दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेत पंच म्हणून म्हणून माजी केंद्रीयमंत्री अजय माकण, इम्रान प्रतापगडी, दिल्ली महिला प्रदेशाध्यक्ष अल्का लांबा, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, राघीनी नायक, जैवीर शेरगील, प्रणव झा यांनी भूमिका बजावली. देशातील ३०० स्पर्धकातून तिघांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.*यामध्ये दिल्ली येथील अवनी बन्सल यांनी प्रथम, तेलंगणाचे विगेंद्र वर्मा यानी दुसरा क्रमांक मिळाला असून कृष्णा यांनी तिसऱ्या क्रमांकासह राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविले आहे. कृष्णा तवले यांचे मूळगाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील शेलगाव (जा) आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here