उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर: उद्या बांधणार शिवबंधन

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिला मातोंडकरला फोन केल्यामुळे ती शिवबंधन बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मुंबई : काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा (Urmila Matondkar Shivsena) आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी आल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर उर्मिला शिवबंधन बांधणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. याला निमित्त ठरलं ते शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिलाला केलेला फोन (Urmia

गेल्याच आठवड्यात उर्मिला मातोंडकरने काँग्रेसला रामराम ठोकला होता. पक्षांतर्गत राजकारण सोडवण्यासाठी आपला वापर झाल्याची उद्विग्नता उर्मिलाने व्यक्त केली होती. त्यावेळी पक्षांतराबाबत उर्मिलाने मौन बाळगलं होतं

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपले आणि शिवसेनेचे कौटुंबिक स्नेह आहेत. त्यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादाचा राजकीय संबंध जोडू नका, असं आवाहन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे. उर्मिला यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली असली, तरी त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याबाबत काहीच बोललो नसल्याचा दावा (Urmila Matondkar Shivsena) नार्वेकरांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here