उपवासाचा समोसा
साहित्य-
उकडलेले बटाटे,
उकडलेले रताळे,
उकडलेली कच्ची केळी,
शेंगदाणे कूट,
ओलं खोबरं,
मीठ,
जिरे, ४-५ हिरव्या मिरच्या,
तूप,
कढीपत्ता,
कोथिंबीर,
आले,
उपवासाचं भाजणी पीठ,
साबुदाणा पीठ,
राजगिरा पीठ
कृती-
प्रथम एक वाटी उपवासाच्या भाजणीत एक चमचा साबुदाणा पीठ व एक चमचा राजगिरा पीठ घेऊन त्यात तुपाचे मोहन घालून घट्टसर मळून घ्या.
कढईत तूप गरम झाल्यावर फोडणीसाठी जिरे, कढीपत्ता, आले व हिरवी मिरची पेस्ट घालून परतवून घ्या.
त्यात उकडून कुस्करलेले रताळे, बटाटे व केळी घाला.
त्यात शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून गॅस बंद करा.
भिजवलेल्या पिठाची पोळी करून मधोमध कापून घ्या.
दोन्ही भागांचे कोन बनवून त्यात वरील सारण भरून कोनांची तोंडं बंद करावीत.
समोसे तयार करून तुपात तळून घ्या आणि नारळ चटणी सोबत सर्व्ह करा.
Advocate Shital Bedre ह्यांनी share केलेली रेसिपी