उन्नती सेवा भावी संस्था भिंगार यांचा जळीत दुकानदारांना मदतीचा हात – सपो निरीक्षक शिशिर देशमुख

445

उन्नती सेवा भावी संस्था भिंगार यांचा जळीत दुकानदारांना मदतीचा हात – सपो निरीक्षक शिशिर देशमुख

अहमदनगर(प्रतिनिधी)- भिंगार येथे नेहरू मार्केट येथील जळीत टेलरिंग दुकानदाराना 6 सिलाइ मशीन व आर्थिक मदत उन्नती सेवा भावी संस्था भिंगार यांच्या तर्फे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीशीर देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी उन्नती संस्थेच्या कामाचे कौतुक केले लॉकडाऊन पासून गोरगरिबांना मोफत जेवण वाटप, तसेच कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना किराणा मालाची मदत असे भरपूर मदतीचे कार्य उन्नती संस्था करीत आहे पन आज त्यांनी भिंगार येथील नेहरु मार्केट मधील जळालेल्या दुकानदारांना सिलाई मशीन तसेच आर्थिक मदत देऊन त्यांचा उदरनिर्वाह चा फार मोठा प्रश्न सोडवला आहे त्यांचे सारखे दुसऱ्या दानशूर लोकांनी सुद्धा पुढे येऊन हया गरीब दुकानदारांची मदत करण्याचे आवाहन देशमुख साहेबांनी केले तसेंच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन तर्फे दहाहजार रुपये रोख उन्नती संस्थेला देण्यात आले


यावेळी मतीन सय्यद यांनी बोलताना सांगितले की शिशिर देशमुख यांनी रात्री 2 वाजता दुकाने जळत असताना रोडवर पूर्ण ट्रॅफिक जाम झाले होते त्या वेळेस भिंगार कॅम्प चे सहायक निरीक्षक शिशिर देशमुख साहेबांनी ताबडतोब हजर राहून पोलसाचा फौज फाटा लावून प्रथम ट्रॅफिक बाहेरून वळऊन VRDE, अहमदनगर MIDC, अहमदनगर मनपा,राहुरी नगर परिषद, च्या अग्निशमन च्या गाड्या तातडीने बोलूउन आग आटोक्यात आणली त्यामळे कोणतीही जीवित हानी झाली नाही त्या साठी त्यांचा नागरी सत्कार केला तसेच उन्नति सेवा भावी संस्था भिंगार यांचे कार्याचे दखल दुसऱ्या सामाजिक संस्थेनी सुद्धा घेतली पाहिजे असे सांगितले यावेळेस गरजूंना मदत देण्यात आली

1)मोनिका माळवदे यांना पिको सिलाई मशीन

2)महेमुद पठाण याना सिलाई मशीन

3)माळवदे काका यांना सिलाई मशीन

4)महेश बकरे यांना सिलाई मशीन

5)धीरज परदेशी यांना सिलाई मशीन

6)दिलीप बकरे यांना सिलाई मशीन

7)पिरमोहम्मद अत्तार यांना रोख रक्कम 7000 रुपये देण्यात आले

हया कार्यक्रमात उन्नती सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव आमसर,उपअध्यक्ष तथा माजी तहसीलदार दत्ता लोखंडे,न्यानेश्वर फासे,उपाध्यक्ष गणेश उपरे,मतीन सय्यद,सागर कांबळे,गजानन भांडारे,राजू नागपुरे,शिवम भांडरी,दीपक धकाते,सीमाताई केदारे,ममता ताई नागपुरे,नाणेश्वर माऊली,अच्युत चिंनके,दीपक राहिंज,देविदास कुमठेकर हे सभासद उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here