महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्या,बुधवार दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तसेच ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी दिली आहे.




