- कोरोना व ओम्रीकॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहरातील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- काल औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे १०३ रुग्ण आढळले त्यापैकी ८७ रुग्ण शहरात मिळाल्याने मुंबई – पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा देखील उद्या म्हणजेच ६ जानेवारीपासून बंद ठेवण्याचा मोठा निर्णय महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला आहे.
- दरम्यान, दहावी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू असतील. तर दहावीच्या पुरवणी परीक्षा देखील नियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील.
- सदरील आदेश हे ३१ जानेवारीपर्यंत हे लागू असतील त्यानंतर प्रादुर्भाव लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.
- ४ जानेवारी रोजी औरंगाबाद शहरातील रुग्ण संख्येने शंभरी पार केली, त्या आधी संपूर्ण आठवड्यातील रुग्णसंख्येत हळू हळू वाढ दिसून येत होती. मात्र रुग्णांनी पन्नाशी पार केलेली नव्हती. काल अचानक रुग्णांनी शंभरी पार केल्याने ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची शंका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज लगेच ५ जानेवारी रोजी औरंगाबाद महापालिकेनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते आठवी वर्गासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- औरंगाबाद शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद..





