उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर ते रश्‍मी ठाकरेंनाही मुख्यमंत्री करू शकतात : चंद्रकांत पाटील

435

Maharashtra Winter Assembly Session : आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे.  यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच शाब्दिक ‘वॉर’ रंगल्याचं चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे.   

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे मनात आणलं तर रश्‍मी ठाकरे यांनाही मुख्यमंत्री करू शकतात. 45 दिवस झाले मुख्यमंत्री नाहीत. या पदाचा चार्ज आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाकडे तरी द्यायला हवा. रश्मी ठाकरे यांना आधी शपथ द्यावी लागेल, परंतु ठाकरे काही करू शकतील त्यांचाही असाच शपथ विधी झाला होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.  त्यांनी मनात आलं तर रश्मी ठाकरे काय ते तेजस ठाकरे यांनाही मुख्यमंत्री करू शकतील, असंही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मागील 2 वर्षांपासून सर्व सिस्टम कोलॅप्स झाल्या आहेत. सरकारचा अधिकाऱ्यांवर धाक राहिलेला नाही. त्यामुळे माहिती समोर येतेय की अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी रडारवर आहेत. यामध्ये तथ्य असू शकतं, असं पाटील म्हणाले. 

पाटील यांनी म्हटलं की, राज्याचे पोलीस सक्षम किती आहेत हे दिसलं आहे. लोकशाहीमध्ये आम्हाला काही मागणी करण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदींचं मुखदर्शन झालं नसलं तरी ते सर्व ठिकाणी कार्यशील आहेत. ते उपलब्ध नाहीत असं नाही. मुख्यमंत्र्यांनी किमान आदित्य ठाकरे यांना तरी चार्ज द्यावा परंतु त्यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही का? असा टोलाही त्यांनी लगावला. 

आजपासून अधिवेशनाला सुरुवातहिवाळी अधिवेशनाला नागपूरऐवजी मुंबईतून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.  इतर महत्वाच्या बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here