उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा सहाभागी होण्याचे आवाहन-नगर तहसीलदार
नगर प्रतिनिधी:-मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा विषय घेवुन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, तरी तहसीलदार अहमदनगर तथा सहा मतदार नोंदणी अधिकारी अहमदनगर यांच्या कडून जाहीर आव्हान करण्यात येते की, अहमदनगर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा. तसेच गणेशोत्सव मंडळांना आव्हान करण्यात येते की, मताधिकार जागृतीविषयीचे व्हिडिओ क्लिप्स , घोषवाक्य तसेच मंडपाच्या ठिकाणी मतदार यादी मध्ये नावं नोंदणी करण्याविषयी जनजागृती करणारे बॅनर लावणे, सदर स्पर्धेमध्ये मतधिकार बजावतांना जात, धर्म, पंथ लिंग, निरपेक्ष राहुन आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मतधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर अल्पशा सजावटीतुन जनजागृती करणे हा या निवडणुका विभागाचा व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा आहे.स्पर्धा साठी नियमावली ठरून दिली आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुले आहे, मतधिकार जनजागृती अनुसरून साजावटीचे किमान पाच फोटो पाठवावेत, मतधिकार जनजागृती मुळ फोटो असावा त्यावर नाव ,लोगो,फ्रेम, डिझाईन असे ईतर काही जोडून नाही. प्रत्येक फोटो २०० किबी,साईज जिपीजी मध्ये असावा,पाच फोटोची एकत्रित साईज १ एमबी पेक्षा जास्त असु नये,चित्रफीत व्हिडिओ अपलोड करतांना मुळ रुपांत आहेत,त्या स्वरुपात पाठवाणे गरजेचं आहे,३०सेकंद किंवा जास्तीत जास्त १ मिनिटांचा असावा,ध्वनीचित्रफितीची साईज जास्तीत जास्त. १००एमबी असावी तसेच ही ध्वनी चित्रफित एमपी फाॅमेंट मध्ये असावी.स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयांवर पाच फोटो आणि व्हिडिओ पाठवणार्या स्पर्धकांचेच अर्ज ग्राह्य धरला जाईल, आपले फोटो आणि चित्रफित https://froms.gle/6TxQHaKSAhZmBbQFA या गुगल अर्जावरील माहिती भरून यावर पाठवावेत,ज्या स्पर्धकांना फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्यास अडचण आल्यास अविराज मराठे मोबाईल क्र.७३८५७६९३२८,प्रणव सलगरकर ८६६९०५८३२५, या व्हाॅट्सॲप क्रमांकावर मेसेज पाठवून कळवावे.हि स्पर्धा १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. आलेल्या सजावटीमधुन सर्वोत्तम सजावट निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षक आणि आयोजक यांचेकडे राहिलं.स्पर्धकांनी पाठविलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामीत्व, हक्क सांगीतल्यास त्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धाकाची असेल. स्पर्धा १ते ८ मुद्द्या प्रमाणे स्पर्धा होणार आहे सदर स्पर्धा कोरोनाचे नियमांचे पालन करुन घेतली जाणार आहे. या स्पर्धेत जास्ती जास्त सहभाग घेवा..





