
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील गोकुलपूर अरसारा गावात शनिवारी एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील पाच जणांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली.
आरोपी शिववीर यादव (30) यानेही गुन्हा केल्यानंतर आत्महत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याची पत्नी डोली (24) आणि मावशी सुषमा (35) यांनाही जखमी केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिववीरचे भाऊ भुल्लन यादव (25) आणि सोनू यादव (21), सोनूची पत्नी सोनी (20) आणि मेव्हणा सौरभ (23) तसेच मित्र दीपक (20) अशी मृतांची नावे आहेत.
आरोपी नोएडा येथील एका खासगी कंपनीत काम करत होता.
“मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तपास सुरू आहे,” असे मैनपुरीचे एसपी विनोद कुमार यांनी सांगितले.
या गुन्ह्यामागचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.