
नवी दिल्ली: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर निर्माणाधीन नमामी गंगे प्रकल्पात झालेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. उत्तराखंडचे एडीजीपी व्ही मुरुगेसन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “एक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह सुमारे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की रेलिंगवर करंट होता आणि तपासात पुढील तपशील समोर येईल.” जखमींना उपचारासाठी हेलिकॉप्टरने एम्स ऋषिकेश येथे नेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले.






