उंब्रज पोलीस टीमची उत्तम कामगिरी मोटार सायकल चोर गजाआड:

दि.१८ ऑगस्ट २०२१सातारा :- उंब्रज ता.कराड गावचे हद्दीत गणेश तानाजी शिंदे रा. उंब्रज ता. कराड यांची पांढ-या रंगाची होन्डा कंपनीची अँक्टिवा क्र. एम. एच. ५० एच. २९१४ ही एम इसम चोरुन नेत असले बाबत स.पो.नि अजय गोरड यांना फोनद्वारे नांगरीकांनी कळविले. स.पो.नि. अजय गोरड यांनी पोलीस कर्मचारी आसिफ जमादार व टीम यांना सदर मोटार सायकल चोरुन नेणारे इसमांस ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. उंब्रज गावातील नागरीकांच्या साहयाने पोलीस नाईक आसिफ जमादार यांनी मौजे कोटी येथे सदर मोटार सायकल चोरुन नेणारे इसमास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव संभाजी बबन जाधव वय ३६ वर्षे रा. अतित ता.जि. सातारा असे सांगितले. सदर इसमाचे ताब्यातील पांढ-या रंगाची होन्डा कंपनीची अँक्टिवा क्र. एम. एच. ५० एच.२९१४ ही ताब्यात घेऊन सदर इसमास पोलीस ठाणेस आणले. सदर घटनेबाबत उंब्रज पोलीस ठाणेस गु.र.नं. ४२५/२०२१ भा.द.वि. ३७९ याप्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर इमसमास अटक करणेत आली आहे. सदर इसमावरती यापूर्वीही वेगवेगळ्या पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरी बाबत गुन्हे दाखल आहेत.सदर कार्यवाही ही मा.पोलीस अधिक्षक सो अजय बन्सल अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक आसिफ जमादार, पो.कॉ. पृथ्वीराज जाधव, पो.कॉ. श्रीधर माने यांनी केली असुन पुढील तपास पोलीस नाईक आसिफ जमादार हे करीत आहेत…उंब्रज हद्दीमधील नागरीकांना आवाहन करणेत येते की, आपले वाहन पाकींग करीत असताना हॅन्डल लॉक करुनच पार्क करावे. रात्रीच्या वेळी घरासमोर गाडी पार्क केली असता शक्यतो लोखंडी साखळीचा वापर करुन गाडी लॉक करावी. आपले आसपास संशयित वाहन दिसुन आलेस उंब्रज पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड यांचे ९६२३९६१००० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here