शेवगाव (प्रतिनिधी )-या बाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीयअध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात ईव्हीएम विरोधात मतदारांची स्वाक्षरी मोहीम दि ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे या अनुषंगाने आज शेवगाव येथे शहर व तालुक्यातील अनेक स्वाभिमानी मतदारांनी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीमेत उपस्थिति दर्शवली शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा किसन चव्हाण यांनी प्रथम स्वाक्षरी करून तालुक्यातील स्वाक्षरी अभियानास सुरुवात झाली शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल हा अनपेक्षित आणि चमत्कारिक लागलेला असून हा निकाल भाजपने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएम या यंत्राच्या माध्यमातून लावून घेतलेला आहे, अशा निकालाने देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात असून तिचा गळा घोटण्याचाच प्रकार भाजप सत्तेचा गैरवापर करून करत आहे त्यामुळे ईव्हीएम हटाव देश आणि देश बचाव यासाठी यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपर घेण्यात याव्या यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार आहे. यावेळी वंचित चे अरुण पाटील झांबरे, ऑगस्टीन गजभीव, लक्ष्मण मोरे, शेख सलीम जिलाणी, गणेश बोरुडे, संभाजी कुसळकर,भिमा गायकवाड, सुरेश खंडागळे, नितीन गुंजाळ, पप्पू गर्जे, संजय चव्हाण, ज्ञानेश्वर पिटेकर, सुंदर आल्हाट,प्रमोद गजभीव ,भिमराज लक्ष्मण फडके, पठाण महेमुद याकुबभाई ,शेषराव आव्हाड, सतिश शेषराव ठोंबे,दिलिप वाघमारे व ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते*ताजा कलम**या निमित्ताने व्ही. व्ही. पॅट मशीन मधुन प्रिंट होऊन बाहेर पडणाऱ्या चिन्हांच्या स्लिप चि जरी कॉऊंटिंग केली तरी सत्ताधाऱ्यांचे पितळ उघड पडणार आहे निवडणूक आयोग त्या सर्व स्लीप क्रश करण्याची घाई का करत असते ??? आणि त्या बाबत कमालीची गोपनीयता का बाळगली जाते ??? हे प्रश्न कोणालाच पडत नाहीत व हे एक ना उलगडणारे कोडे आहे. हे सरकार युतीचे सरकार नसून ईव्हीएम सरकार आहे अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
पूर्व लडाख पंक्ती: भारत आणि चीन उर्वरित समस्या सोडवण्यास सहमत आहेत
दुर्मिळ दोन दिवसांच्या लष्करी चर्चेत, भारत आणि चीनने सीमावर्ती भागात शांतता आणि शांतता राखण्याबरोबरच पूर्व लडाखमधील वास्तविक...
NEET निकाल 2023: NEET चे निकाल जाहीर झाल्यामुळे ट्विटरवर मीम्सची धूम आहे
परिणाम तपासणे हा कोणत्याही विद्यार्थ्यासाठी सर्वात चिंताजनक अनुभव आहे. त्यांच्या अंतःकरणात अस्वस्थता असल्याने, प्रत्येक विद्यार्थी परीक्षेत चांगल्या...
शेख कामिल अहमद इम्रान हा 12 सायन्स मध्ये चांद सुलताना जुनियर कॉलेज मध्ये प्रथम
अहमदनगर येथील चाँद सुलताना ज्यू कॉ चा सायन्स विभागाचा विद्यार्थी श्री शैख कामिल अहमद इम्रान हा नुकत्याच...
महिला कोटा विधेयकावरुन प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शहांवर निशाणा साधला
नवी दिल्ली: महिला कोटा कायद्याचा मसुदा लवकरात लवकर लागू करण्याच्या विरोधकांच्या आवाहनादरम्यान सीमांकन समितीच्या स्थापनेमागील तर्क स्पष्ट...


