ईदसाठी लवकर एप्रिल महिन्याचे वेतन

‘यंदा ३ मे रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळे, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन २५ एप्रिलपर्यंत देण्यात येणार आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे आदेश दिले.-

यंदा ३ मे रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळे, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन २५ एप्रिलपर्यंत देण्यात येणार आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे आदेश दिले.

ईद असल्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन लवकर करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली होती. त्यानुसार, राज्य शासनाने या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत सुमारे साडेचार हजार शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन अद्यापही रखडले आहे.

शिक्षकांनी घेतलेल्या पतसंस्था व बँकेच्या कर्जाचे हप्ते यामुळे थकीत असून हजारो रुपयांचा दंड सोसावा लागत आहे.जिल्हा परिषदेकडे वारंवार मागणी करूनही प्रशासन याबाबत दुर्लक्ष करीत आहे.

शासनाने पीएफएमएस प्रणालीचा वापर करून वेतन १ तारखेला देण्याची घोषणा केली होती. मात्र, ती अजूनही अमलात आलेली नाही.

त्यामुळे शिक्षकांना दर महिन्याला वेतनासाठी तिष्ठत राहावे लागते आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी याबाबत योग्य तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेतर्फे शरद भांडारकर, मनोज घोडके, हरिश्चंद्र दहाघाणे, नंदकिशोर उजवणे, प्रदीप दुरगकर तसेच इतरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here