वास्तविक ई-अमृत पोर्टलचा उद्देश लोकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागरूक करणे हा आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे फायदे ग्राहकांना पटवून देण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून भारतात सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
नवी दिल्लीः यूके येथे COP26 शिखर परिषदेत इलेक्ट्रिक वाहनांवर (EVs) ई-अमृत हे वेब पोर्टल सुरू केलेय, असं भारताने बुधवारी ग्लासगोमध्ये सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित सर्व माहितीसाठी हे एक-स्टॉप डेस्टिनेशन किंवा पोर्टल आहे. जिथे इलेक्ट्रिक वाहने (EV), त्यांची खरेदी, गुंतवणुकीच्या संधी, धोरणे, सबसिडी यासह सर्व माहिती मिळेल. हे पोर्टल NITI आयोगाने ब्रिटिश सरकारसोबत सहयोगात्मक ज्ञान विनिमय कार्यक्रमांतर्गत सुरू केले. याशिवाय हे पोर्टल यूके-भारत संयुक्त रोडमॅप 2030 चा भाग आहे, ज्यावर या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली.ई-अमृत पोर्टल म्हणजे काय?वास्तविक ई-अमृत पोर्टलचा उद्देश लोकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागरूक करणे हा आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे फायदे ग्राहकांना पटवून देण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून भारतात सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. एकीकडे सरकारही याबाबत लोकांना जागरुक करत असताना अनेक ठिकाणी खरेदीसाठी अनुदान जाहीर करण्यात आले आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक त्याकडे वळतील. भारताने वाहतूक कार्बनमुक्त करण्यासाठी आणि देशभरात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी अनेक पुढाकार घेतलेत. FAME आणि PLI सारख्या योजना इलेक्ट्रिक वाहने (EVs) लवकर अंगीकारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी विशेषतः महत्त्वाच्या आहेत.