इन्फिनिटी ट्रेडींग मल्टीसर्विसेस नावाचे बोगस शेअर मार्केट चा भामटा बिगबुल फरार आरोपी आदित्य कुंदा अंधारे यास शेवगांव पोलिसांनी केली शिताफीने अटक

    163

    शेअर मार्केटच्या नावाखाली ८० लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालणा-या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलीसांनी १२ तासाच्या आत भामटा बिगबुल आदित्य कुंदा अंधारे या फरार आरोपीला सेवगावच्या दबंग पोलिसांनी केले गजाआ…

    या बाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी नामे प्रशांत महादेव नलावडे वय ३६ वर्षे, धंदा शेती रा. विदयानगर शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी नामे- इन्फिनिटी ट्रेडींग मल्टीसर्विसेस नावाचे शेअर मार्केट या नावाने शिवनगर, शेवगाव व पुणे येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं-६८०/२०२५ भादवि कलम ४२०,४०९,४०६ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम, १९९९ चे कलम-३ प्रमाणे दिनांक ०८/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील फरार आरोपी बाबत माहिती घेतली असता आरोपी हा यापुर्वीच शेवगाव शहर सोडुन फरार झाल्याची माहिती कळल्याने भौतिक व तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता नमुद गुन्हयातील आरोपी हा पुणे येथे गेले असल्याचे समजल्याने मा. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शेवगाव पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करुन जिल्हा पुणे येथे रवाना करण्यात आले होते. नमुद गुन्हयातील फरार आरोपी नामे आदित्य् कुंदा अंधारे वय-२५ रा. शिवनगर, शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हा न-हेगाव. ता- हवेली, जिल्हा- पुणे येथे आरोपीचा शोध घेत असतांना आरोपीला पोलीस पथक आल्याची चाहुल लागताच नमुद गुन्हयातील आरोपी पळून जात असताना आरोपीला महर्षी कर्वे फॅशन कॉलेज इन्स्टिटयूट येथुन पोलीसांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला शिताफिने ताब्यात घेवुन त्यास दि.०५/०८/२०२५ रोजी नमुद गुन्ह्यात अटक करुन मा/हु न्यायालया समोर हजर केले आहे.वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शना खाली सध्या ऍक्शन मोडवर असलेले शेवगांव चे पो. नि. श्री संतोष मुटकुळे सो, पोसई बाजीराव सानप, पोहेकों किशोर काळे, पोकों शाम गुंजाळ, पोकों भगवान सानप, पोकों दादासाहेब खेडकर, पोकों राहुल आठरे, पोकों ईश्वर बेरड, पोकों राजु बढे, पोकों सचिन पिरगळ, पोकों रोहित पालवे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोकों राहुल गुड्डु यांनी केली असून वरील गुन्ह्यांचा पुढील तपास पोसई बाजीराव सानप हे करत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here