इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

738

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अहमदनगर: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित. यांचे जिल्हा कार्यालय अहमदनगरच्या वतीने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून व्याज परतावा कर्ज योजना 10 लाखापर्यंत 100 प्रकरणे, बीज भांडवल कर्ज 63 प्रकरणे, बचतगटासाठी गटकर्ज व्याज परतावा योजना (10 ते 50 लाख) 12 प्रकरणे एवढे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लाभार्थीने शासनाच्या अधिकृत www.msobcfdc.org या वेबपोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.

तरी इच्छुक लाभार्थींनी अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक दिनेश चव्हाण, (9767585964) जिल्हा कार्यालय, सारसनगर, साई सोना अपार्टमेंट जवळ, अहमदनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबतच महामंडळाकडून 1 लाखाच्या थेट कर्ज योजने अंतर्गत बिनव्याजी 121 ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना लघुउद्योगासाठी वरील कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी अर्जदाराचा सीबील क्रेडिट स्कोअर 500 असणे बंधनकारक आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here