“इकडे संप सुरूय, तिकडे त्यांचं नाचगाणं!”, देवेंद्र फडणवीसांची धनंजय मुंडेंवर टीका

547

Beed : परळीमध्ये धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केलीय. हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं काल परळीत ठुमके लगावले. मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत स्नेहमिलन आणि फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात सपना चौधरीच्या डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावर भाजपनं आक्षेप घेतलाय. राज्यात एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे आणि दुसरीकडे यांचं नाचगाणं सुरू आहे अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here