इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 10 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून, तर 10 ते 12 प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती जण होते याची ठोस माहिती अद्यपपर्यंत मिळू शकलेली नसून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. नर्मदा नदीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढली आहे. बसचा फक्त सांगाडा उरला आहे. बसची अवस्था पाहून अपघातीची तीव्रता किती असेल याचा अंदाज येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here