:इंग्लंडहून आलेल्यांमध्ये अहमदनगरचा एक पॉझिटिव्ह
अहमदनगर : इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांमध्ये अहमदनगरमधील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंडमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहेे. इंग्लंडहून अनेक जण मायदेशी परतत आहेत. त्यात राज्यातील देखील अनेक जण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. राज्यात आजपर्यंत १ हजार १२२ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात नागपूर ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी ३, पुणे २ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १, असे बाधित आढळले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित कोरोना बाधित आढळले आहेत.