
जैन मंदिर भूखंडावरून आ. संग्राम जगताप यांच्यावर आरोप करणाऱ्या ठाकरे शिवसेना महानगर प्रमुख क्रिण काळे यांना आ. जगतापांनी ५१ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे. लेखी व सार्वजनिक माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी, दिवाणी कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे. यावर पत्रकार परिषद घेत काळेंनी जोरदार पलटवार केला आहे. धर्म रक्षण, मंदिर भूखंड रक्षणासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे. मी फकीर आहे. मी भगवी झोळी घेऊन दारोदार फिरून आमदारांना ५१ कोटी गोळा करून देणार असल्याचे काळे यांनी जाहीर केले आहे.
आ. जगतापांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावली, हडप केली. त्यावर स्वतःचे राजकीय कार्यालय थाटल. जुन जैन मंदिर पाडलं, असे आरोप काळेंनी कैले होते. त्यावर जगताप यांचे सदर जागेवर अधिकृत कार्यालय नाही. त्यांचा कोणता फलक, बॅनर नाही. स्वतंत्र, वेगळे अधिकृत कार्यालय असल्याचे जगताप यांनी नोटीस मध्ये म्हटले आहे. काळे यांनी यावर पुन्हा जोरदार आक्षेप घेतला आहे. द्रम्यान, या प्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सखोल चौकशी सुरू केली आहे.
काळे म्हणाले, जगतापांचा कार्यकर्ता गणेश गोंडाळ याने सदर भूखंडावर त्याचा ताबा असल्याचे, त्या ठिकाणी जगताप यांची ऊठबस असल्याचे प्रसार माध्यमां समोर सांगितले आहे. मयत महिलेच्या धर्म कार्या साठीच्या भूखंडावर राजरोसपणे ताबेमारी भूमाफियांनी केली आहे. त्यांनी माझ्यावर जरूर खटला दाखल करावा. मला तुरुंगात डांबावे. परंतु त्याआधी आ. जगताप, ट्रस्ट अध्यक्ष, सर्वे ट्रस्टी, सहकार ट्रस्टी, स्वयंघोषित भाडेकरू यांनी राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज साहेबांच्या समाधी समोर येऊन पुराव्यानिशी चर्चा करावी. मी खोटा असेल तर नुसता लेखीच माफीनामा काय, मी नाक रगडून माफी मागायला तयार आहे. त्यासाठी तुम्ही वेळ, तारीख सांगा, मी यायला तयार असल्याचे म्हणत काळेंनी जगतापांना खुले निमंत्रण दिले आहे. जगताप ते स्वीकारतात का हे आता पाहावे लागणार आहे.
किरण काळे म्हणाले, मी फकीर आहे. माझ्या नावावर या शहरात एक स्क्वेअर फूट सुद्धा जमीन नाही. माझ्याकडे बळकवलेले प्लॉट, इम्पोर्टेड गाड्या नाहीत. माझ बियर, वाईन शॉप नाही. माझा लॉजचा धंदा नाही. जर ५१ कोटी रुपये मी तुम्हाला दिले तर तुम्ही मंदिराचा भूखंड खाली करणार असाल, तर भगवी झोळी घेऊन मी बाजारात फिरणार आहे. धर्म रक्षणासाठी मी वाट्टेल ती किंमत किंमत मोजाय मोजायला तयार आहे.
अदखलपात्र म्हणता, अंधारात ५१ कोटींची दखल घेताः यापूर्वी आ. जगताप यांनी काळे हे अदखलपात्र असल्याचे म्हटले होते. त्यावर काळे म्हणाले, या अदखल पात्र फकीराला तुम्ही यापूर्वी आयटी पार्कचा भांडाफोड केला म्हणून एक कोटी रुपयांची नोटीस पाठवली. त्याला मी उत्तर दिले. तुम्ही पळून गेलात. मध्यंतरी माध्यमांशी बोलताना आपण तर म्हणाला होतात की किरण काळे नावाचा कोणी माणूसच नगरमध्ये नाही. मात्र आता अंधारात ५१ कोटींची नोटीस पाठवून तुम्ही माझी मोठी दखल घेता. तुम्ही बेगडी हिंदुत्ववादी, भित्रे आहात, असा टोला काळेंनी लगावला आहे.
जगताप यांनी नोटीस मध्ये जागा ट्रस्टच्या नावे आहे. त्यावर भाडेकरूंचा कायदेशीर ताबा असल्याचे म्हटले आहे. यावरून काळे यांनी ट्रस्ट, ताबा मारणारा स्वयंघोषित भाडेकरू आणि जगताप यांचे संगनमत असल्याचाच हा पुरावा असल्याचा दावा केला आहे. मयत महिलेच्या मृत्युपत्रातील एक भाडेकरू मयत झाल्याची आमची माहिती आहे. मात्र अन्य सहा भाडेकरू आज पर्यंत समोर का आले नाहीत ? ज्या चाळीत त्यांचं वास्तव्य होतं ती चाळ बुलडोजर लावून कोणी पाडली ? ट्रस्ट अध्यक्ष मुथा यांच्या व्यतिरिक्त इतर ट्रस्टी, सहकार ट्रस्टी का गप्प आहेत ? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नोटीस मध्ये आ. जगताप यांनी अहिल्यानगरचा उल्लेख अहमदनगर केल्या कडे काळेंनी लक्ष वेधले. आमदारांना अहिल्यानगर हे नाव मान्य नाही. त्यांच्या मनात अजूनही अहमदनगरच आहे. नामांतराचा विकासाशी दुरान्वये संबंध नसला तरी यावरून राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे पितळ उघडे पडले असल्याचे काळे यावेळी म्हणाले.


