आशिया कप 2023 साठी ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा

    142

    आशिया कप 2023 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या यजमानपदी खेळला जाणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंत 15 आवृत्त्यांमध्ये भारताने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे.

    भारतानंतर सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने 6 वेळा जेतेपदावर कब्जा केला आहे. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकामुळे आशिया चषक 2023 देखील एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाईल. आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवडकर्ते सोमवारी आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करतील. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती सोमवारी आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. टीम इंडियाला मधल्या फळीतील दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुलची उणीव भासत आहे. केएल राहुल 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक असणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here