आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा! हे आहेत शिलेदार

    202

    30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. अशातच आशिया चषकाच्या भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

    यामध्ये भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज असणार आहेत. तर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    आशिया चषक भारतीय संघ :

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here