आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी शिवसेनेचा मोठा निर्णय

    114

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच आशिया कपमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. आता या सामन्याच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतलाय. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर या सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

    संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतला आहे. अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जात आहे. हे लोकभावनेविरुद्ध आहे. अजूनही 26 निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले, त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे, असे म्हणताय. पाकिस्तानचे कंबरडे मोडू असे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असे देखील म्हणाले. आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे? भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे ते त्यांनी सांगावं, असे आव्हान त्यांनी दिले.

    माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेची महिला आघाडी 14 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. ‘माझं कुंकू-माझा देश’ असा आंदोलन केलं जाईल. “सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’ असे आंदोलन असणार आहे. मोदींना महिला सिंदूर पाठवतील. ते अभियान सुद्धा आम्ही राबवणार आहोत. या मॅचचा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला मॅच बघायला जातील. जय शाह तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. अमित शाह आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिक्वतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो, असे म्हणतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here