
आशिया कप 2023 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अ गटातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्याचवेळी कोलंबो श्रीलंकेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुपर-4 सामनेही रद्द होण्याचा धोका आहे.
अशा परिस्थितीत एकीकडे सामने डंबुला येथे हलवण्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांना स्पर्धेचे उर्वरित सामने पाकिस्तान येथे हलवण्याची आवाहन केले आहे.
पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी एसीसी अध्यक्ष जय शाह यांना श्रीलंकेतील खराब हवामान पाहता आशिया कप 2023 चे उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये हलवण्याची सूचना केली आहे. कोलंबोमध्ये हे सामने 9 सप्टेंबरपासून खेळवले जातील आणि त्यानंतर फायनलही तिथे खेळवण्यात येईल.
कँडी येथे भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, जिथे भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर पावसामुळे सामना झाला नाही. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



