आर्यन खानच्या जामीनावर प्रशांत भूषण म्हणाले, हा काय मूर्खपणा !
नवी दिल्ली : ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज आज बुधवारी (ता.२०) न्यायालयाने फेटाळला.

आर्यनसह सात जण अटकेत आहेत. आर्यन खान प्रकरणावर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेले नाहीत. कोणत्याही प्रकरणात आरोपात साधारणपणे जास्तीत-जास्त एक वर्षाचा तुरुंगवास होतो. (Aryan khan case)दोन आठवड्यानंतरही त्याला अद्यापही जामीन मिळालेला नाही. हा काय मूर्खपणा चालू आहे. असं वाटत की बऱ्यात न्यायाधीशांना व्यक्ति स्वातंत्र्य आणि जामीनाच्या तत्त्वांची कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन दिली आहे. सध्या देशात आर्यन खानवरुन राजकारण सुरु झाले आहे. अनेक जण त्यात उड्या घेत आहेत.