अहमदनगर येथील जिल्हा न्यायाधीश साहेब मा. जिल्हा न्यायधिश 2 श्रीमती एम. व्ही . देशपांडे साहेब यांच्या न्यायालयात पो.नि.राहुरी यांचे कडुन आरोपी नवनाथ उत्तम वाघ रा. राहुरी याचे विरध्द अंमली औषधी द्रव्य व मनःप्रभावी अधिनियम २० अ प्रामणे दोषारोप त्र दाखल केले होते.
सदरच्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्या नंतर मा. जिल्हा न्यायधिश 2,श्रीमती एम. व्ही . देशपांडे साहेब यांचकडून आज दिनांक १३ जाने.२०२२ रोजी न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात देण्यात आला. आरोपीची भादवी कलम २०-अ एन.डी.पी.एस.अॅक्ट प्रमाणे असलेल्या गुन्हयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ॲड. एस.पी. कोळसे यांनी कामकाज पाहिले आणि ॲड. तुषार ढवळे, ॲड .सचिन तरटे, ॲड. शितल बेद्रे आणि ॲड. सरिता साबळे यांनी सहा य्यक वकिल म्हणून कामकाज केले.






