आरोग्य विभागातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, एकाच पदावर दोन अधिकारी महापालिका आरोग्य विभागातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, एकाच पदावर दोन अधिकारी काम पहात असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. उपमहापौर गणेश भोसले यांनी याची गंभीर दखल घेतली असून, विना परवानगी कामकाज पाहणार्या अधिकार्यावर काय कारवाई केली, असा प्रश्न त्यांनी आयुक्त शंकर गोरे यांना केला आहे.कोविड काळातील कारभार व अन्य बाबींसंदर्भात सुमारे सतरा गंभीर मुद्दे उपस्थित करून महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना 8 जूनला सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई आयुक्त शंकर गोरे यांनी केली होती. त्यांच्या गैरहजेरीत वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सुपूर्द केला होता. काही दिवसानंतर विविध प्रयत्न करून डॉ. बोरगे यांनी त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यास आयुक्तांना भाग पाडले. त्यांची सक्तीची रजा रद्द करून त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. मात्र हे करतानाच त्यांच्याबाबतच्या गंभीर मुद्यांच्या चौकशीसाठी उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे डॉ. बोरगे यांना महापालिकेत हजर करून घेतले असले तरी त्यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला नव्हता. कामावर हजर करण्यात येत असले तरी कामकाजाबाबत पुढील आदेश काढण्यात येईल, असे डॉ. बोरगे यांना कामावर घेतानाच्या आदेशात नमुद केले होते. डॉ. बोरगे कामावर हजर झाल्यानंतर काही दिवस आदेशाप्रमाणे वागले. मात्र नंतर त्यांनी वरिष्ठांशी चर्चा न करता परस्पर वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाचे कामकाज पाहण्यास सुरूवात केली. या संदर्भात डॉ. राजूरकर यांनी महापालिका आयुक्तांना लेखी स्वरूपात कल्पना दिली. त्यात त्यांनी म्हटले की, डॉ. बोरगे यांनी 7 सप्टेंबरपासून जन्म-मृत्यू विभाग, विवाह नोंदणी विभाग, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गतची प्रकरणे व इतर दस्तावेज स्वस्वाक्षरीने हाताळत आहेत. डॉ. बोरगे यांनी कामकाज पहावे, अशा प्रकारचे कोणतेही आदेश कार्यालयास प्राप्त नाहीत. त्यामुळे एकाचवेळी एकाच पदाचे काम दोन अधिकारी करत असून, ते नियमबाह्य आहे. तसेच अशा प्रकारामुळे भविष्यात गंभीर स्वरूपाच्या कायदेशीर अडचणी निर्माण होण्याचीही शक्यता आहे. तसेच आरोग्य विभागातील इतर कर्मचारीही यामुळे गोंधळून गेले आहेत. कोणाचे आदेश मानावेत, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ते दहशतीखाली आणि दडपणाखाली आहेत. डॉ. बोरगे यांची कार्यपद्धती, वर्तन व वृत्ती अनुभवता त्यांना कामकाज पाहण्यास पायबंद घालणे मला व कर्मचार्यांना शक्य नसल्याने याबाबत योग्य ती दखल घेण्यात यावी, असेही डॉ. राजूरकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, या प्रकाराची उपमहापौर गणेश भोसले यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. एकूणच हा प्रकार गंभीर असून, वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार नेमका कोणाकडे आहे, अशी विचारणा त्यांनी आयुक्त गोरे यांना पत्र देऊन केली आहे. तसेच विना अधिकार कामकाज पहात असल्यास त्यांच्या काय कारवाई केली, आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसुत्रता आणण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
- English News
- Conference call
- Crime
- Cyber crime
- Education
- health
- Lawyer
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- उस्मानाबाद
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- जळगाव
- ठाणे
- नांदेड
- पुणे
- भुसावळ
- मनोरंजन
- श्रीगोंदा
- संगमनेर