आरोग्यासाठी काय बेस्ट.?*पांढरा भात चांगला की ब्राऊन राईस..?

470

अनेकदा वजन कमी करायचे असेल किंवा मधुमेह असल्यास भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. कधी पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी अर्थात ब्राऊन तांदूळ खाण्यास सांगितले जाते..मात्र, दोन्हीमध्ये कोणता तांदूळ आरोग्यासाठी चांगला असतो. याबाबत अनेकांना माहिती नसते.. आरोग्यासाठी पांढरा तांदूळ चांगला की ब्राऊन..? त्याचे आराेग्यावर काय परिणाम होतात, याबाबत आहारतज्ज्ञ भूवन रस्तोगी यांनी याबाबत माहिती दिलीय. पांढरा व ब्राऊन तांदळातील फरक स्पष्ट केला आहे. *आहारतज्ज्ञ काय म्हणतात..?*▪️ पांढरा तांदूळ हा पॉलिश केलेला असतो. पॉलिश करण्यापूर्वी तोही तपकिरी असताे व तो ‘ब्राऊन राईस’ म्हणून विकला जातो. तांदळाला पॉलिश करताना, त्यातील कोंडा व अंकुरीत भाग काढला जातो. मात्र, त्यात भरपूर प्रमाणात खनिजे असतात.▪️ तांदळातील कोंडा फायबरने समृद्ध असतो. मात्र, पॉलिश केल्यानंतर त्यातील फायबर, जीवनसत्त्वे नि खनिजे निघून जातात नि आपल्याला मिळतो पांढरा तांदूळ..!▪️ शिजवल्यानंतर पांढर्‍या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन तांदळामुळे रक्तातील ग्लुकोज पातळी कमी वाढते. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ब्राऊन तांदूळ उत्तम पर्याय आहे. अर्थात, त्यात फायबरची कमतरता असते.▪️ पांढरा भात अनेकांना आवडत असला, तरी त्यात आवश्यक प्रमाणात फायबर नसते. या भातात फक्त कॅलरीज असतात, पण कोणतीही पोषक तत्व नसतात, असे भूवन रस्तोगी यांनी सांगितले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here