आरबीआय गर्व्हनर करोनाबाधित

    नवी दिल्ली – अनेक नामांकित आणि उच्च पदस्थांना करोनाव्हायरसची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर आता देशातील सर्वोच्च बॅंक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोव्हिड19 चा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दास यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली. मात्र, या आजाराची कुठलीही गंभीर लक्षणं नससल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच आयसोलेशनमधून आपण काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
    गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, माझी प्रकृती उत्तम आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी हे सूचित करु इच्छितो. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी रिझर्व्ह बॅंकेचं कामकाज हे नेहमीप्रमाणं सुरु राहणार आहे. सर्व उपगव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांसाठी मी व्हिडिओ कॉन्फरन्स आणि फोनवरुन सर्व दिवसांसाठी उपलब्ध असेन.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here