प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका दीपालीताई बारस्कर यांच्या प्रयत्नातून व आमदार स्थानिक विकास निधीतून कादंबरी नगरी बरबडे वस्ती येथे नागेश्वर मंदिरासमोर सभामंडपाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विकास कामांबरोबरच आपली संस्कृती, अध्यात्मिकता व धार्मिकता टिकणे गरजेचे आहे. यातून नागरिकांमधील विचारांची देवाणघेवाण होण्यासही मदत होते, यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, यासाठी विविध भागातील मंदिरांसमोर सभामंडपाचे कामे करणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शहरामध्ये विविध ठिकाणी सभामंडपाचे कामे सुरू आहेत. नगर शहरामध्ये रहदारीच्या दृष्टीने रस्त्यांचे रुंदीकरण करून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. शहराचा समांतर विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन संपूर्ण भागामध्ये विकास निधी टाकला जात आहे, पुढील ५० वर्षाचा विचार करूनच विविध विकास कामे केली जात असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,सा. कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे,बाळासाहेब पवार,अनिल मुरकुटे,राजेंद्र तागड, योगेश ठुबे,पंढरीनाथ ताले,मुकुंद होशिंग,किरण यादव,संतोष गावडे,डॉ.भागवत गायकवाड आदी उपस्थित होते.
Home महाराष्ट्र अहमदनगर आमदार स्थानिक विकास निधीतून कादंबरी नगरी बरबडे वस्ती येथे नागेश्वर मंदिरासमोर सभामंडपाचे...