आमदार नितेश राणे अहमदनगर दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत घणाघात केला.

709
  • आ. नितेश राणे हे काल अर्थात मंगळवारी अहमदनगर दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील काही संवेदनशील मुद्द्यांवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली.
  • यावेळी त्यांच्यासोबत माजी खा. अमर साबळे देखील होते. यावेळी त्यांची अन जिल्हाधिकाऱ्यांची बंद खोलीमध्ये चर्चा झाली.
  • त्यानंतर आ. राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत घणाघात केला. शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
  • पंजाब येथून अहमदनगरमध्ये आलेला कमलसिंग हा व्यक्ती धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या रामनवमी मिरवणुकीत एका गटाकडून वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली, अशा घटना घडत असताना अहमदनगर जिल्हा पोलीस दल काहीच कारवाई करत नसल्याने आ. राणे यांनी नाराजी व्यक्त केली.
  • ‘लव्ह जिहाद, धर्मांतराची सक्ती, हिंदूंच्या सणांच्यावेळी गोंधळ ते थेट रामनवमीच्या मिरवणुकीच्यावेळी घोषणा देण्यापर्यंत मजल गेली आहे. तरीही पोलिस आणि प्रशासन काहीही करणार नसेल तर अहमदनगरची कायदा व सुव्यवस्था अवघड होत जाईल.
  • एवढे झाल्यांतरही फक्त हिंदूंवरच गुन्हे दाखल होत आहेत.
  • या सर्व गोष्टी सरकारच्या आशिर्वादानेच सुरू आहेत. प्रशासन सरकारच्याच इशाऱ्यावर चालते.
  • त्यामुळे थेट नावानिशी वारंवार तक्रारी करूनही सक्तीने धर्मांतर करणाऱ्या राहुरीतील कमलसिंगवर कारवाई होत नाही. असा घणाघातही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here