मुंबई दि. 13- गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.”आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
कोरोना लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांचं आरोग्य धोक्यात; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता
कोरोना लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे आणि त्यातून शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे.
गर्भातील बाळाला कोरोना...
मुंबईकर महिलेचा दानयज्ञ, टाटा मेमोरियल रुग्णालयाला 120 कोटींची जमीन दान
मुंबईकर महिलेचा दानयज्ञ, टाटा मेमोरियल रुग्णालयाला 120 कोटींची जमीन दान
भारत उष्णतेच्या लाटेखाली वाहून गेला. आजचे सर्वात उष्ण शहर आहे…
सोमवारी देशभरातील शहरांमधील ३६ हवामान केंद्रांवर ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याने भारतासाठी तीव्र उन्हाळा सुरू...
किमान तापमानात घट झाल्याने दिल्लीत दाट धुके; AQI ‘अत्यंत गरीब’ राहिला आहे
गुरुवारी सकाळी दाट धुक्याने राष्ट्रीय राजधानीला सहा तासांहून अधिक काळ वेढले, ज्यामुळे ५० हून अधिक उड्डाणे आणि...





