आपल्याला माहीत आहे का,भारतीय पंचांग पद्धतीमध्ये प्रत्येक वर्षाला एक विशिष्ट नाव असतं आणि प्रत्येक नावाचा एक खास अर्थ असतो …अशी साठ नावं,म्हणजे संवतसर, असतात आणि प्रत्येक नाव साठ वर्षांनी परत येतं. आपलं वर्ष इंग्लिश कॅलेंडर च्या एप्रिल महिन्याच्या मध्यावर सुरू होतं.
आता बघा – २०१९-२० चे भारतीय नाव होते “विकारी”… त्यानं ते नाव खरं केलं…ते खरंच आजाराचं च वर्ष होतं…
२०२०-२१ चं भारतीय नाव होतं
” शर्वरी”, म्हणजे अंध:कार, जे त्यानं सार्थ केलं… जगाला रोगाच्या खाई त अधिकच लोटून…
आताचं २०२१-२२ वर्ष आहे “प्लव” नावाचं,याचा अर्थ आहे संकटातून तारून नेणारं…या नावाचं वर्ष जगाला समस्यांच्या संकटांतून तारून समृद्धीकडे नेईल,अंधारातून प्रकाशाकडे नेईल, असं वराह संहितेत म्हटलं आहे…
त्याहून शुभ वार्ता अशी की या पुढचं म्हणजे २०२२-२३ हे वर्ष आहे ” शुभकृत ” या नावाचं…उघडच आहे की ते वर्ष समृद्धीच आणणार…
उद्या चांगला असेल, अशी आशा आपण ठेवायला हरकत नाही…आपल पंचांग तशी ग्वाही देतय आपल्याला…..!!!!