
राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केसरकर यांनी शिक्षक भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला. शिक्षक सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षकभरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी 11 ते 21 ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी 21 ते 24 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.



