आनंदाची बातमी ! नोव्हेंबर महिन्यापासून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपयांचा लाभ

    70

    Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मध्य प्रदेशराज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे याचे नाव. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

    या योजनेमुळे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. हेच यश पाहून देशभरातील विविध राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावाने ही योजना राबवली जात आहे. हरियाणा सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धरतीवर लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे.

    यामुळे आता या योजनेसाठी इच्छुक महिलांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. योजनेच्या अर्जासाठी आता नोंदणी कार्यालयात जाण्याची कोणतीच गरज राहणार नाही.

    यामुळे गरजवंत महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकाच मोबाईल वरून जवळपास 20 ते 25 अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेचा लाभफक्त हरियाणा राज्यातील महिलांना मिळेल.

    पंधरा वर्षांपासून हरियाणा राज्यात रहिवासी असणाऱ्या महिलांना या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी हरियाणा राज्य सरकार चार हजार 62 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च करणार आहे.

    या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या अनुषंगाने सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

    दुसरीकडे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा ल दिला जाईल अशी घोषणा केली होती. पण अजून राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

    याउलट राज्यातील लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पडताळणी मधून अनेक महिला या योजनेसाठी अपात्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे महिला वर्गामध्ये सरकार विरोधात नाराजी वाढत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here