विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर , अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर, ग्रामपंचायत हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टो.२०२१ रोजी आदर्श गाव हिवरे बाजार ता. जि. अहमदनगर येथे अखिल भारतीय जनजागृती अभियानाचे (पॅन इंडिया अवेरनेस आणि आऊटरिच कॅम्पेन) आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.रेवती देशपांडे दंडे साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.सुधाकर यार्लगड्डासाहेब प्रमुख जिल्हा न्यायधीश साहेब यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.

आदर्शगाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री.पोपटराव पवार साहेब यांनी मार्गदर्शन केले.
मा.ॲड. श्री.सुभाष जे. काकडे (ज्येष्ठ विधीज्ञ )अध्यक्ष सेंट्रल बार असो. यांनी शिक्षणाचे अधिकार यासंबंधी मार्गदर्शन केले.मा.ॲड. भूषण ब-हाटे अध्यक्ष बार असो. यांनी अन्न विषयक कायदा या बद्दल मार्गदर्शन केले.
मा.ॲड. सतीश पाटील जिल्हा सरकारी वकील अहमदनगर यांनी सामाजिक सेवा विषयी कायद्यातील तरतुदी बद्दल माहिती दिली.
मा. निखिल ओसवाल साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी मा. श्री. ए.पी. कुलकर्णी साहेब,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अहमदनगर.श्री डी आर दंडे साहेब, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अहमदनगर, श्रीमती रेश्मा होजगे (बी. डि. ओ.),ॲड. शेखर दरंदले,ॲड. अनुराधा येवले,ॲड.विक्रम वाडेकर,ॲड. योगेश गेरांगे,ॲड. सौरभ काकडे,ॲड. शीतल बेद्रे, विधी सेवा प्राधिकरण अहमदनगरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तरआभार प्रदर्शन मा.चंद्रकांत खाडे साहेब विस्तार अधिकारी अहमदनगर यांनी केले.





