
Sambhajinagar-Pune Railway:- सध्यामराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असलेले छत्रपती संभाजीनगर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे या महत्त्वाच्या दोन शहरांदरम्यान प्रवास करायचा असेल तर सध्या तब्बल नऊ तासांचा कालावधी हा रेल्वेने लागतो. या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवासांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु सध्या जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर होऊन पुण्याला जायचे असेल तर सध्या मनमाड, कोपरगाव, बेलापूर आणि अहिल्यानगर मार्गे असे 421 किमीचे अंतर पार करावे लागते.
रस्ते मार्गाने जायचे असेल तर 230 किलोमीटर इतके अंतर असून याकरिता पाच तासांचा कालावधी लागतो. परंतु वाहतूक कोंडी प्रचंड असल्याने कधी कधी आठ तास देखील लागतात व रेल्वेने मात्र मनमाडमार्गे तब्बल नऊ तासांचा वेळ लागतो. या सगळ्या समस्येवर मात करण्यासाठी विदर्भ तसेच खानदेश आणि मराठवाड्यासाठी फायद्याचा ठरेल असा संभाजीनगर ते अहिल्यानगर या नवीन रेल्वे मार्गाचा 2900 कोटींचा डीपीआर केंद्र सरकारकडे सादर केला असून केंद्र आणि राज्य सरकार 50-50 टक्के हिश्यातून हा रेल्वे मार्ग तयार करणार आहेत. याच रेल्वेमार्ग विषयीची माहिती लेखात बघू.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे किंवा छत्रपती संभाजीनगरच नाही तर संपूर्ण विदर्भ तसेच खानदेश व मराठवाड्याकरिता फायद्याचा ठरेल असा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या नवीन रेल्वेमार्गाचा 2900 कोटींचा डीपीआर केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेला असून केंद्र आणि राज्य प्रत्येकी 50 टक्के हिश्यातून हा रेल्वेमार्ग तयार करणार आहेत.
याकरिता आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करणार आहे. आता याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळताच प्रत्यक्ष मार्गासाठी अधिग्रहणाचे काम सुरू होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. या रेल्वे मार्गाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या दोन्ही शहरातील अंतर कमी होण्यास मदत होणार असून साडेचार तासात शटल सेवेच्या माध्यमातून पुणे शहर गाठणे सोपे होणार आहे.
वाचेल दीडशे किमीचा फेरा
47सध्या छत्रपती संभाजीनगर हून पुण्याला जाण्यासाठी प्रथम मनमाड, कोपरगाव, बेलापूर आणि अहिल्यानगर मार्गे 421 किमीचे अंतर कापत पुणे गाठावे लागते. रस्तेमार्गाने हे अंतर 230 किमी इतके आहे याकरिता पाच तासांचा कालावधी लागतो. परंतु रस्ते मार्गाने प्रवास करताना अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे आठ तासाचा कालावधी यामध्ये खर्च होतो.
आणि छत्रपती संभाजीनगरहून जर मनमाड मागे रेल्वेने पुणे जायचे राहिले तर तब्बल 9 तास लागतात. परंतु आता या छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना 159 किमीचा फेरा कमी होणार आहे. तर छत्रपती संभाजी नगर ते पुणे शहरातील अंतर 250 किमीपेक्षा कमी होणार आहे. सध्या हा डीपीआर केंद्राच्या कॅबिनेट समोर सादर करण्यात आल्याचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे.



