आता महिलांना मिळणार 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट* केंद्र सरकारची नवीन योजना

562

केंद्र सरकारने आजपासून गावात राहणाऱ्या महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे – याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय पाच हजार रुपये मिळतील तसेच ही एक ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे – तसे पहिले तर अश्या सुविधा जेष्ठ नागरिकांना दिल्या जात होत्या, मात्र आता या सुविधा ग्रामीण महिलांनाही मिळणार आहेत *अशी असणार हि योजना ?* 18 डिसेंबर 2021 रोजी केंद्र सरकार स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे – यावेळी ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा , दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत – ग्रामीण भागातील महिलांसाठी 5000 रु. ची ओवरड्राफ्ट सुविधा सुरू करणार आहे – या कार्यक्रमात सरकारी बँका आणि राज्य ग्रामीण भागातील सर्व बँकेचे सचिव देखील सहभागी होणार आहेत तसेच 2019-20 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे दरम्यान या योजनेविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here