आता निलेश राणेही अडचणीत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे हे मागील काही दिवसांपासून कायदेशीर कारवायांमुळे चर्चेत आहेत. कारण त्यांना मागे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर नितेश राणे यांच्यावर संतोश परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे.
आता नेते नारायण राणे यांचे दुसरा मुलगा माजी खासदार निलेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवा (1 फेब्रुवारी) सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला.त्यानंतर निलेश राणे हे आमदार नितेश राणेंसोबत जायला निघाले असता पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला.
या प्रकरणात आता निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला.
यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.निलेश राणे पोलीस अधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले असताना पोलीस आमची गाडी अडवूच कशी शकतात, असा जाब निलेश राणे यांनी पोलिसांनी विचारला.
बराचवेळ हा वाद सुरु होता. दरम्यान न्यायालयाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी निलेश राणे यांच्यासह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांशी हुज्जत घातली सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हे दाखल करण्यात आलेत.
दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, ऑर्डर झाली म्हणून संपलं असं त्यांना वाटलं होतं. आम्ही अर्ज केला आहे त्यावर तुम्हाला म्हणणं मांडायचं आहे. त्यामुळे परत चला हे सांगण्यासाठी नितेश राणेंना थांबवण्यात आलं होतं.
त्यांचे वकील पुन्हा कोर्टात आले होते. सर्वांना थांबणं भाग होतं त्यामुळे नितेश राणेंना थांबवलं असं घरत म्हणाले.