महत्वाच्या बातम्या वाचा आता नितेश राणे आणि निलेश राणेंवरही ‘या’ कारणामुळे गुन्हे दाखल!
कालच्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे व निलेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 30 ते 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर भाजप चे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 50 ते 60 व्यक्तींवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा 135, 188, 143 अन्वये हे गुन्हे दाखल झाले आहेत.






