- अभिनेता, विनेदवीर अशी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याला अमाप प्रसिध्दी तर मिळालीच आहे. शिवाय दिवसागणिक त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. त्याने त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवरपर्यंतचा प्रवास केला आहे. आता कपिल शर्मा याच्या जीवनावर बायोपिक येणार आहे. ‘फनकार’ असे बायोपिकचे नाव असल्याची माहिती समोर आलीय.
- त्याच्या आयुष्यावर चित्रपट येतोय. कपिलचे आयुष्य जाणण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. हा बायोपिक फुकरे चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबा दिग्दर्शित करतील. बायोपिकचं नाव असेल ‘फनकार’. या बायोपिकची निर्मिती महावीर जैन हे लायका प्रोडक्शस अंतर्गत करतील.
- या बायोपिकमध्ये स्वत: कपिल भूमिका करेल की अन्य कलाकार, याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.






