आता अल्पवयीन मुलाचे पॅनकार्ड घरबसल्या काढा…! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

425
  • अल्पवयीन मुलांचेही पॅन कार्ड बनवले जाऊ शकते. परंतु, अल्पवयीन मुलाला पॅन कार्डसाठी थेट अर्ज करता येत नाही तर त्याच्या पालकांनीच यासाठी अर्ज करावा लागतो.!!
  • *असा करा पॅन कार्डसाठी अर्ज!*
  • ● प्रथम NSDL च्या साईटवर जा.
  • ● त्यानंतर ज्या अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड काढायचे आहे, त्याचा सेक्शन निवडा.
  • ● सेक्शन निवडण्यासाठी मुलाची सर्व माहिती भरा. त्यामध्ये अल्पवयीन मुलाच्या वयाचा दाखला आणि पालकांच्या फोटोसह इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • ● आई आणि वडिलांची डिजिटल स्वाक्षरीही अपलोड करावी लागेल. महत्वाची बाब म्हणजे पॅन कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला 107 रूपये फी भरावी लागेल.
  • ● ही फी डिजिटल स्वरूपात भरता येईल. फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल.
  • ● अर्ज सबमिट केल्यानंतर मेलवर कंफर्मेशन येईल.
  • ● अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रिसीट नंबर मिळेल, तो सांभाळून ठेवायचा आहे.
  • ● कारण या नंबरवरूनच अर्जाचा स्टेटस पाहता येणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 दिवसांनी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मुलाचे पॅन कार्ड पोहोच होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here