आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. अमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.